Now Loading

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; पहिली ते चौथीचे वर्गही भरणार

२:०७AM AS. 4 (19 मुंबई : गेल्या १ वर्ष नऊ महिन्यापासून कोरोनामुळे राज्यात बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहे. प्राथमिक शाळासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात येत्या १ डिसेंबरपासून पुन्हा शाळा सुरू होणार असून मोठ्या कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते ४ थीची शाळा सुरू करण्यात येणार आहेत. नुकतीच प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिली होती. पण त्यानंतर टास्कफोर्सने शाळा सुरू करण्यासंदर्भात होकार दिला होता. त्यानंतर प्रशासन आणि टास्क फोर्सने मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना संकट नियंत्रणात असल्याचे जाहीर करत राज्यातील पाचवी ते दहावीचे वर्ग आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. आता राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकरात्मक असल्याचे समजते. मात्र आता पहिली ते ४ थीची शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हासुरू करण्यावर जोर दिला होता. 'आदर्श शाळा' राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी शासनाने 'आदर्श शाळा' हा उपक्रम हाती घेतला आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे, असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. शाळांच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यात आली. या शाळांमधील सद्यस्थितीचाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला.