Now Loading

प्रभाग १८ मध्ये आज जनजागरण रॅली

केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनापासून म्हणजेच दि. १४ ते २९ नोव्हेंबर या पंधरवड्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात काँग्रेसचा कार्यकर्ता जनतेच्या दारापर्यंत जाऊन नागरिकांशी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविषयी संवाद साधत आहे. त्याअंतर्गत आज दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर जिल्ह्याचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही जनजागरण रॅली निघणार असून संपूर्ण प्रभागातील नागरिकांशी सुसंवाद साधला जाणार आहे. प्रभागातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकत्यांनी या जनजागरण रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सिकंदर पटेल, सुंदर पाटील कव्हेकर, माजी नगरसेवक असगर पटेल, माजी नगरसेविका अंजली चिंताले, गोविंद पवार, भारत साखरे, आसिफ पटेल यांनी केले.