Now Loading

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी आज बीड जिल्हा दौऱ्यावर !!

नाव्होली तालुका केज येथे शेतकऱ्यांचा संताप मेळावा केज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करत आहे सध्या महावितरण कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रब्बी हंगामामध्ये मध्ये थकीत वीजबील वसुली साठी बेमुदत बेकायदेशीररित्या वीजपुरवठा खंडित केला आहे त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई, थकीत व चालू वर्षी चा पीकविमा, शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. महावितरण कडून होत असलेल्या सक्तीच्या वीज बील वसुली विरोधात शेतकऱ्यांना एकजुट करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व बळीराजा प्रतिष्ठान, नाव्होली यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संताप मेळावा आज दि. 26 नोव्हेंबर 2021 वार शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला असल्याची माहिती बळीराजा प्रतिष्ठानचे सचिव सी. बी. एस इनामदार यांनी दिली आहे. या शेतकरी संताप मेळाव्याला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे संघटना जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर, जेष्ट नेते अशोक अण्णा गीते ,प्रमोद पांचाळ, बिभीषण इंगळे, विश्वास जाधव, अशोक साखरे, सुग्रीव करपे, नवनाथ काकडे आदी... पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांनी केले आहे.