Now Loading

पक्ष बळकटीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेनी प्रयत्न करा -सौ विजया  पाटील 

देशाचे लोकनेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून व विकासनशील दूरदृष्टीच्या विचारातून विकासाची गंगा दारी आणा  ही संकल्पना अंगिकारत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व पक्ष बळकट टिच्या मार्गदर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माननीय खासदार सौ सुप्रिया  सुळे साहेबा यांच्या मार्गदर्शना खाली आज राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्हा महिला नवनियुक्त पक्ष निरीक्षिका माननीय सौ विजया  पाटील यांचे धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना धुळे जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या शिलेदार सौ गायत्री  पाटील, धुळे सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ शोभा आखाडे,धुळे अल्प संख्यांक विभागाच्या अध्यक्षा शकिला बक्ष,धुळे अर्बन सेलच्या अध्यक्षा सौ विजया  साळुंके सौ उषा पाटील, सौ प्रविणा भावे, सौ छाया सोमवंशी, सुषमा  महाले, सौ सुरेखा  नांद्रे व त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बहुसंख्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तसेच यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनिरीक्षिका सौ विजया पाटील यांनी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विविध अडीअडचणी समजून घेत तसेच पक्षासाठी सुरू असलेल्या त्यांच्या कार्य अहवालाची माहिती घेत व पक्ष बळकटीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करीत देशाचे लोकनेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांसाठी नवनवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी केलेले कार्य तसेच जास्तीत जास्त महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडीत व ध्येय धोरणाच्या विषयी माहिती चे आदन प्रदान करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य सूचारू पद्धतीने चालविण्या विषयी मार्गदर्शन केले.अशी माहिती धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या शिलेदार सौ गायत्री पाटील यांनी दिली व श्री अविनाश राजाराम लोकरे प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहर कार्यकारणी.