Now Loading

वनाचे रक्षण करणाऱ्या वनरक्षकाच्या सुरक्षाकडे दुर्लक्ष !

चंद्रपूर:- जंगलाला आगीपासून वाचवणारा वनरक्षक हा वनखात्याच्या सुरक्षा श्रेणीतील पहिला आहे. थोड्याथोडक्या मासिक वेतनासोबतच हे जवान इतर सुविधांपासूनही वंचित आहेत. मात्र, कुटुंबापासून दूर असलेल्या या सुरक्षाजवानांना कोणत्याही आधुनिक सुविधा मिळत नाहीत. प्रामुख्याने लाकूडचोरी तसेच वाळू व खाण माफियांपासून त्यांना सर्वाधिक धोका आहे. जंगलात अवैध शिरकाव करणाऱ्या आणि शिकाऱ्यांच्या होतो. संघटित समूहाशी त्यांचा वारंवार सामना वन्यप्राण्यांपासून जंगल व परिसरातील गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील या जवानांवर आहे. त्यांच्या कामाचे तास निश्चित नाहीत. कोणत्याही अत्याधुनिक शस्त्राशिवाय तस्करांचा सामना ते करतात. अनेक किलोमीटरपर्यंत वाहतुकीची सुविधा नसताना ते पायी चालतात. थंडी असो वा पाऊस वनकर्मचारी जंगलात त्याच अवस्थेत जंगलाची सुरक्षा करतात. पण प्राथमिक उपचाराच्याही सुविधा त्यांच्याजवळ नाहीत. भारतात वनखाते हे असे एकमेव खाते आहे ज्यांच्या देशातील सुमारे एक चतुर्थांश जागेवर असीमित अधिकार आहे. खात्यातील कर्मचाऱ्यांची दुर्दशा कायम आहे