Now Loading

शेतात शेळ्या आल्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने फोडले डोके

अंबाजोगाई : तालुक्यातील लिंबगाव येथे शेतात शेळ्या कश्या आल्या असे म्हणत बापलेकाला मारहाण करुन कुऱ्हाडीने एकाचे डोके फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात बदार्पूर पोलिसांत गुन्हा नोंद केला गेला आहे. सुरज लक्ष्मण काळे (२५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी ते आपल्या गट क्रमांक १२४ मधील शेतात असताना दत्ता काळे, सतिश काळे, नितीन काळे, राजेंद्र काळे यांनी संगणमत , करुन तुमच्या शेळ्या आमच्या तूरीच्या शेतात का येऊ दिल्या अशी कुरापत काढून वाद घातला. यावेळी सुरज व त्याचे वडिल लक्ष्मण यांना माराहण करण्यात आली. या वादात सुरजच्या डोक्यात कु हऱ्हाडीने मारुन डोके फोडण्यात आले. या प्रकरणी चौघांवर बदार्पूर पोलिसांत गुन्हा नोंद केला गेला आहे.