Now Loading

मतदान विभागातील बोगस नोदणी तात्काळ थाबंवा सलीम बापु

माजलगाव .तालुक्यातील अनेक गावा सह शहरातील वार्डा - वार्डात काही ठिकाणी सुरू असलेली बोगस मतदार नोंदणी तात्काळ थांबवण्यात यावी नसता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनहित काँग्रेस पार्टी व भीम आर्मी भीम सेनेचे महाराष्ट्रराज्य नेते सलीम बापू यांनी येथील तहसीलदार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या गंभीर प्रश्नां विषय सलीम बापू यांनी काल दि. २४ नोव्हेंबर रोजी येथील तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हंटले आहे की, माजलगाव शहरामध्ये प्रभाग क्रं. १२ मधील भाग क्रं. ६७, ६८, ६९ मध्ये इतर ठिकाणच्या लोकांची बोगस कागदपत्र तयार करुन मतदान यादीला नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. या कामी तहसील मधील काही कर्मचारी आशा लोकांना मदत करत असल्याचा आरोप करत त्यानी आशा प्रकरणात या अगोदर सन २०१६ साली पण असे प्रकार घडलेले असतांना अशा लोकांची नांवे कमी करुन या लोकांवर शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे व निवडणूक विभागामधील सर्व अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. वरील प्रकरणी लक्ष पूर्वक कार्यवाही करण्यात यावी या बोगस नोंदणी मुळे लायक माणसं बाजूला राहून समाज हिताचे कसलेही देणे घेणे नसणाऱ्या माणसं निवडली जातात त्यामुळे लोकशाही प्रभावी पणे राबवणे कठीण जाते म्हणून ही बोगस मतदार नोंदणी तात्काळ थांवण्याचे आदेश - तहसीलदार यांनी संबंधित विभागाला द्या अन्यथा आपल्याकार्यालयासमोर वेळप्रसंगी आंदोलने करण्यात येतील, असा इशारा ही भारतीय जनहित काँग्रेस पार्टी व भीम आर्मी भीम सेनेचे राज्य नेते सलीम बापू यांनी निवेदनात दिला आहे.