Now Loading

केज नगर पंचायत मधे पाहिजे कृतीशील व गावाला पुढे घेऊन जाणार नेतृत्व केज नगर पंचायत होऊन दहा वर्ष झाली परंतु आतापर्यंत केज शहराला कोणताही आकार देऊ शकले नाहीत अजुनही रस्ते नाल्याच्या पलीकडे काम करण्याचा विचार बहुतेक करून सत्ता चालवणाराना व विरोधकाना आला नाही. नुसात्या गोल गोल गप्पा मारुन शहरातील नागरिकांना आतापर्यंत गुलविल असल्याचे नागरिक बोलत असतात परंतु नागरिकांना अजून पर्यंत मुलभुत सुविधा सुध्दा नियमित मिळत नसल्यामुळे अजून तरी केज शहराला योग्य पर्याय निर्माण झाला नसल्याचे नागरिक पण बोलत आहेत. बघु आता तरी केज शहराला चांगले नगरसेवक लाभतील का ते व खरच बकाल वाढलेल्या केज शहराला योग्यदिशा लाभते का ते पहाव लागल केज शहराच्या मुख्य समस्या अश्या आहेत वारंवार रस्ते करून करून देखील अजूनही शहराच्या बहुतांशी भागात रस्ते चांगले झालेलेच नाहीत, रस्त्याच्या बाजुनी झालेल्या नाल्या या विना नियोजन नाल्या बांधून काढल्याने पाऊस झाला की कचरा सह पाणी रस्त्यावर येते प्रत्येक गल्लीत डुकरांचा सुळसुळाट झालाय सगळ्या गल्ल्यानी घाणच घाण पसरालेली आहे, डासांचा उच्छाद मांडलेला आहे, नळाला पाणीआठ पंधरा दिवस 9 नाही, रस्त्यावर दिवे कधीकधी जळतात सगळीकडे नुसताच उच्छाद मांडलाय. केज शहराला हवय व्यापाऱ्यांना व्यापारी संकुल ज्यामुळे एक चांगली बाजारपेठ ईथ मिळेल, वृध्दासाठी फिरायला जायला एक चांगला पार्क पाहिजे, लहान मुलासाठी सायंकाळी फिरायलाजायला बाग पाहिजे, नवनवीन लघु उद्योग इथे उभारायला पाहिजे, रोजगाराच्या संधी इथेच निर्माण व्हायला पाहिजेत तरुणाईच्या हाताला काम कलाकारासाठी नाट्यगृह, खेळाडुसाठी क्रिडांगण , 9 प्रत्येकाचा विचार करून काम केले तर केज भविष्यात सदृढ राहील नाहीतर ही दोन हायवेचे काम संपले तर पुन्हा केजला उभारी येईल का नाही सांगता येत नाही. आतापर्यंत सगळ्यानी नुसती आश्वासन देऊन आशेला लावून नागरिकांना वेठीस धरलेले आहे त्यामुळे आता नागरिकांनाच विचार करावा लागेल की पुन्हा पुन्हा हेच निवडून देऊन आपल्या स्वतःच्या आयुष्यात वाट लावून घेण्यापेक्षा आता नविन विचार करतील असच वाटतय.