Now Loading

संविधान दिनानिमित्त भिसी येथे समता सैनिक दलाची रॅली व अभिवादन

चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील भिसी येथील समता सैनिक दलाच्या ( महिला विभाग ) वतीने आज 26 नोव्हेंबर, संविधाम दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जाऊन भंतेजी च्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जुनी भिसी च्या बौद्ध विहारातून रॅली ची सुरुवात करण्यात आली.शांततेने, रांगेत, शिस्तबद्ध रीतीने ही रॅली गावातून मार्गक्रमण करत बुद्धम शरणम गच्छामी चा जयघोष करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आली. तिथे वंदना व अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर रॅली पुन्हा जुनी भिसी येथील बुद्ध विहाराकडे परत गेली. समता सैनिक दलाच्या महिला, युवती दलाच्या गणवेशात ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते.