Now Loading

लोकप्रतिनिधींची उदासीनता; नागरिकांच्या तक्रारी ऐकायला प्रशासनाचे कानावर बोट ! लवकरच सरफराज मणियार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक

लातूर शहर दिवसा गणिक वाढत आहे, त्याच्या गरजासुद्धा वाढत आहे. परंतु मागील काही वर्षांपासून जुन्या लातूर शहर म्हणजेच गावभागाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. या भागात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या जास्त आहे. मनपा प्रशासनाला या भागाचे विकास करण्यासाठी विविध सामाजिक संघटनेकडून आंदोलन, निवेदने देण्यात आली. परंतु मनपा प्रशासनाने कानावर बोट ठेवण्यापलीकडे काही केले नाही. हजरत सुरत शहा शादीखान्याचे काम गेली कित्येक वर्षांपासून रेंगाडत पडले आहे. याकडे कुठल्या ही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची खंत महाराष्ट्र जनएकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख यांनी व्यक्त केली. गावभागाच्या विकासासाठी लवकरच सरफराज मणियार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मनपाच्या सततच्या दुर्लक्षामुळे या भागाचा विकास झालेला नाही. नागरिकांना मूलभूत हक्कासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. या भागातील रस्ते जीर्ण अवस्थेत आहेत; तर नळाला अस्वछ पाणी येत असल्याने येथील नागरिक व बालके आजारी पडतात. लोकप्रतिनिधी व नगरसेवक या भागाकडे लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी गावभागाच्या विकासासाठी लवकरच सरफराज मणियार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. या संदर्भात मनपा आयुक्त आणि महापौरांना निवेदने देऊन विनंत्या केल्या गेल्या पण काहीच उपयोग झाला नाही असे इरफान शेख म्हणाले. म्हणून या बैठकीत या भागाच्या विकासासाठी सरफराज मणियार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करून विकास करण्यासाठी व्यापक आंदोलन करण्याच्या तयारीत येथील नागरिक असल्याचे महाराष्ट्र जनएकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख इरफान यांनी सांगीतले.