Now Loading

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तैनुर शेख

बारामती : भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी बारामती येथील साप्ताहिक व वतन की लकीरचे निर्भीड संपादक तैनुर शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली. बारामती येथे नुकतीच संघाची मासिक बैठक संपन्न झाली या बैठकीला उपस्थित असणारे भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अॅड. कैलास पठारे व जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले. या वेळी दि पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑप. सोसायटीचे संचालक अॅड. पांडुरंग ढोरे, पुणे वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. योगेश तुपे, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे,पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ,दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम,बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडीबद्दल शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे