Now Loading

वसतिगृहात शिरला पट्टेदार वाघ विध्यार्थी नसल्याने कोणतीही जिवित हानी नाही

चंद्रपूर:- जिल्ह्यातील सिंदेवाही येथेआज सकाळी साडे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या समोरील भागाच्या लोखंडी गेट वरून उडी मारून पट्टेदार वाघ वसतिगृहाच्या आतमध्ये घुसला यावेळी वस्तीगृहाला सुट्ट्या असल्याने कोणीही विध्यार्थी हजर नव्हते केवळ चौकीदार आपल्या खोलीत उपस्थित होता त्यामुडे कोणतीही जीवित हानी झाली नाही सिंदेवाही येथील पाथरी रोड वर वसलेले मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हे अगदी रस्त्याच्या कडेला असून शेत शिवार लागूनच आहे परंतु या वस्तीगृहाच्या मागील बाजूस घनदाट जंगल असून नेहमीच या परिसरात वाघाचा वावर असतो आणि नेहमीच वाघाचे दर्शन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घडत असते परंतु इतक्या सकाळी मंजे 9 वाजेच्या दरम्यान अचानक पणे शेतशिवारातून पट्टेदार वाघ येऊन वस्तीगृच्या उंच अश्या गेट वरून उडी मारून प्रवेश करणे मंजे आश्चर्यकारक बाब आहे सदर वाघ हा प्रवेश करून आतमध्ये आल्याचे चौकीदाराच्या लक्षात येताच त्याने वसतिगृहाचे अधीक्षक श्री विष्णुजी घुबे सर यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली लगेच त्यांनी ही बाब वनविभागाच्या अधिकारी यांना सांगितले असता त्यांची चमू वेळीच उपस्थित होऊन वाघाला हाकलून लावले जर आज वस्तीगृहात विध्यार्थी असते तर खूप मोठी घटना घडली असती सध्या सुट्ट्या असल्याने विध्यार्थी आपल्या स्वगावी गेले आहेत तिथे केवळ चौकीदारच असतो पुढे देखील अश्या घटना घडू नयेत या करिता संपूर्ण वसतिगृहाच्या वाल कंपाउंड वरून काटेरी तारांचे कुंपन करण्यात यावे तसेच सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वसतिगृह अधीक्षक विष्णुजी घुबे सर यांनी तसेच बाजूच्या शेतकऱ्यांनी केली आहे