Now Loading

२७०० कोंबडयांवर विषप्रयोग साडेपाच लाखांचे नुकसान

धुळे तालुक्यातील कावठी येथील एका शेतातील पोल्ट्री फार्मच्या २७०० कोंबडयांवर विष प्रयोग करुन ५ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  शेतकरी संतोष भाईदास पाटील रा कावठी ता. धुळे यांचे गावाच्या परिसरात शेत आहे. शेतात पोल्ट्री फार्म असून कोंबडयांना पाणी पुरवठयासाठी पाण्याची टाकी व पाणी पुरवठयासाठी भांडे ठेवलेले होते. त्यात अज्ञात इसमाने दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ते पहाटे ६ वाजेच्या दरम्यान काहीतरी विषारी औषध टाकले. त्यामुळे माझ्या पोल्ट्री फार्ममधील २७०० कोंबडया हया मृत्यूमुखी पडल्या असून त्यात माझे ५ लाख ४० हजारांचे नुकसान झाले आहे. तेथे ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्यातुन व कोंबडयांना पाणी पुरवठयासाठी ठेवलेल्या भांडयातुन विषारी औषधाचा वास येत आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त हे परिसरात जावुन धडकताच घटनास्थळी शेतकNयांनी एकच गर्दी केली होती. अज्ञात आरोपी याने केलेल्या या कृत्याने शेतकNयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात आरोपी कोण, त्याने हे कृत्य का केले असावे या संदर्भात परिसरातून दबक्या आवाजात चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास असई वानखेडे हे करीत आहेत्