Now Loading

रतनकुमार साळवे यांना "उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार" प्रदान*

*रतनकुमार साळवे यांना "उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार" प्रदान* औरंगाबाद दि.२८ संशोधन विध्यार्थी समिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतीक महासंघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले परिवर्तवादी साहित्य संमेलन नुकतेच औरंगाबादेत संपन्न झाले. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यग्रहात रविवारी पार पडले. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. कांचन देसरडा,जनार्धन म्हस्के, डॉ. वाल्मिक सरवदे, जयश्री सोनकवडे, डॉ. राहुल म्हस्के, अँड.पंकज बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरानी यावेळी मार्गदर्शन केले. पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्र निळे प्रतीकचे संपादक, रतनकुमार साळवे, अनिकुमार जमदडे, शांतीलाल गायकवाड, माणिक साळवे, प्रा. भारत सिरसाट आदिना यावेळी सन्मानित करण्यात आले. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रकाश इंगळे हे होते, भरत हिवराळे, समाधान दहिवाल अनिल दिपके, जयश्री शिर्के आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.