Now Loading

अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

अकोला: अकोला जिल्ह्यात हवामान बदलामुळे प्रत्येक नागरिक त्रस्त झाला असून आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्याने प्रामुख्याने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रविवारी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सियस पर्यंत घसरल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच हा पावसाचा इशारा लोकांची कोंडी करणारा आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके, धान्य यांचे रक्षण करा असे आवाहन केले आहे.