Now Loading

सुखी जीवनासाठी तथागत बुद्ध प्रणीत नैतीक मूल्यांचे पालन करणे महत्वाचे आहे - प्रा डॉ बालाजी गव्हाळे*

*सुखी जीवनासाठी तथागत बुद्ध प्रणीत नैतीक मूल्यांचे पालन करणे महत्वाचे आहे - प्रा डॉ बालाजी गव्हाळे* गंगाखेड : २८ : भारतात बुद्ध पूर्व काळात अंधश्रध्दा व अनैतिक प्रथांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे लोक दुःखी व असमाधानी होते. अशा परिस्थितीत लोकांना दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग तथागत बुद्धांनी शोधून काढला. लोकांचे जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी त्यांनी पंचशीलाचा मार्ग दिला. भिक्खूंना व लोकांना त्यांनी या नैतीक मूल्यांची शिकवण दिली. तथागतांची ही शिकवण आजही प्रासंगिक व अनुकरणीय आहे. सुखी जीवनासाठी बुद्ध प्रणीत नैतीक मूल्यांचे पालन करणे महत्वाचे आहे. असे विचार पालि भाषेचे आणि साहित्याचे अभ्यासक डॉ बालाजी गव्हाळे यांनी व्यक्त केले आहे. बामसेफ जिल्हा युनिट परभणी यांच्या वतीने क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि आर एस टोके हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लक्ष्मण व्हावळे यांनी क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांच्या प्रतिमास पुष्पहार अर्पण केला. शाहीर प्रा भगवानराव गायकवाड यांनी जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे गीत सादर केले. नंतर - ' बुद्ध प्रणीत नैतीक मूल्ये आणि भारतीय दंडसंहीता ' या विषयावर प्रा डॉ बालाजी गव्हाळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना प्रा बालाजी गव्हाळे यांनी विनय पिटकातील जीव हिंसा , चोरी , खोटेपणा , व्यभिचार व व्यसन यासंबंधीच्या पाराजिका या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेतील कलम व शिक्षेच्या तरतूदी याबाबत सविस्तर माहीती दिली. अनेक उदाहरणांतून त्यांनी तथागत बुद्ध प्रणीत मूल्ये व भारतीय दंड संहीता याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच बुद्ध जीवन मूल्ये लोकाभिमूख करण्यासाठी करावयाच्या वैयक्तीक , सामाजिक , शैक्षणिक , शासकीय व प्रशासकीय कार्याची रुपरेषा देखील त्यांनी याप्रसंगी मांडली. या कार्यक्रमाचा सविस्तर असा अध्यक्षीय समारोप इंजि आर एस टोके यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा डॉ संतोष हंकारे यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय अॅड संदीप थोरात यांनी केले. मारोती गोटमुखले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा भगवानराव गायकवाड यांच्या ऊर्जादायी भीमगीताने झाला. या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात बेचरभाई राठोड बामसेफचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व मोहनभाई परमार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष इन्साफ , गोंविदभाई सोळंकी- गुजरात , मिलिंद भिंगारे राष्ट्रीय महासचिव बामसेफ, सचिन भंडारे , लक्ष्मण सावंत -पंढरपूर , प्रा. डॉ. चोरपगार मॅडम -नागपूर , ॲड शाम तांगडे साहेब , प्रा. किर्तीराज लोणारे - अंबाजोगाई , विलासराव जंगले ( आण्णा ) , प्रा. डॉ. किर्तीकुमार मोरे , प्रा. डॉ. भिमराव खाडे , प्रा. डॉ. सारिकाताई केदार मॅडम, प्रा. सिंधु खंदारे मॅडम , दिक्षा दळवी , रंजनाताई तुपे , मिरा व्हावळे , स्नेहलताताई , विद्याताई , प्रा. घाडगे , रवि डोणेकर , गौतम गायकवाड , ग्यानबा नाईकवाडे , केशव भावे , प्रशांत सुतारे , व्ही. आर. गोरे , दिपक कांबळे , आनंद घन , गुरुदास कोचे , संजय वाटोरे , अशोक ठोके , छगन व्हावळे - मुंबई , प्रा. बालाजी गायकवाड , अशोक व्हावळे , राहूल साबणे , लाडगे सर , साचिन गायकवाड ,आदींचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयु. डि. जी. वाळवंटे , आर.जी. मस्के , नितिन वाकळे , अबासाहेब उपाडे ,डॉ. आनंद वाव्हळे ,संग्राम गायकवाड , एकनाथ दिवसे , श्याम आवचार , सुभाष वाघमारे आदीनी परिश्रम घेतले.