Now Loading

अंबाजोगाई : शहरालगतच्या चनई शिवारात रविवारी (दि. २८) सकाळी

अंबाजोगाई : शहरालगतच्या चनई शिवारात रविवारी (दि. २८) सकाळी कामानिमित्त गेलेल्या विधवा महिलेवर एका तरुणाने अत्याचार केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदरील पिडीतेच्या पतीचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झालेला आहे. तिच्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी आडस रोडवरील एका शाळेतून तिला काम करण्यासाठी बोलावण्यात आले होते. ती शाळेकडे निघाली असता वाटेत चनई शिवारात ८.३० वाजताच्या सुमारास तिच्या पाठीमागे आलेल्या सुग्रीव गंगाराम गोचडे याने तिला थांबवले आणि रस्त्याच्या कडेच्या तुरीच्या शेतात चालण्याचा आग्रह धरला. पिडीतेने त्यास नकार देताच सुग्रीवने जबरदस्तीने तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. दुपारच्या सुमारास पिडीतेने अंबाजोगाई शहर ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. सदर तक्रारीवरून सुग्रीव गोचाडे याच्यावर कलम ३७६, ३४१, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक चोरगे करत आहेत.