Now Loading

मातीच्या डिगाऱ्यामुळे रस्ता वाहतुकीस नाहक त्रास अपघाताची शक्यता

            चिमूर:-  नेरी तळोधी  मार्गावरील सिरपूर समोर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली असून रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु होते ही भिंत बांधण्यासाठी रस्त्याच्या बाजूची खोदलेली माती ही रस्त्यावर टाकल्यामुळे तसेच ही भिंत बांधण्यासाठी आणलेली गिट्टी सुद्धा रस्त्यावर टाकल्यामुळे वाहतुकीस नाहक त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता आहे तरी हा मार्ग बनविणाऱ्या कंपनीने तात्काळ ही माती तसेच मटेरियल तात्काळ उचलून  रस्ता जाण्यायेण्यासाठी खुला करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत अन्यथा सदर मार्ग बनविणाऱ्या कंपनी वर कारवाई करावी अशी मागणी जनतेची होत आहे        मागील दोन महिन्यापासू नेरी सिरपूर बोथली तळोधी मार्गाच्या बांधकाम सुरू आहे या मार्गाच्या संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू होते दिवाळी पूर्वीपर्यंत काम चालले आणि आता काम अर्धवट ठेवून बंद आहे या कामाची माती ही रस्त्यावर टाकल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे समोरा समोर वाहन आले तर वाहने जाऊ शकत नाही तसेच दि 27 ला रात्री दोन वाहने समोरासमोर येताच रस्ता पार करण्यासाठी जात असताना ट्रक रस्त्याच्या बाजूला गेला वाहकांचा दक्षतेने थोडक्यात बचावला नाहीतर ट्रक शेतात पलटला असता अश्याच प्रकारे अनेक प्रकार वाहतूक करताना घडले असून अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला या रेती गिट्टी आणि माती मुळे अनेक दुचाकी स्वार स्लिप होऊन पडले आहेत शेतकऱ्यांना सुद्धा बैलबंडी व जनावरे घेऊन जाताना कसरत करावी लागते कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे त्यामुळे मोठी कसरत करून वाहतूक या भागातून करावी लागते तेव्हा सदर रस्ता तयार करणाऱ्या कंपनीने तात्काळ माती उचलावी तसेच मटेरियल सुद्धा उचलून मार्ग मोकळा करावा अशी मागणी जनता करीत आहे अर्धवट कामपूर्ण करावे नाहितर या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी जनतेनी केली आहे