Now Loading

पत्री पुला वरून कल्याणच्या दिशेने भरधाव येणाऱ्या वाहना मुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ पत्री पुल परिसरात सिग्नल यंत्रणा बसविण्याची मनसेची पालिके कडे मागणी ... पालिका प्रशासनाने मागणी कडे दुलक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.

कल्याणातील बहुचर्चित पत्री पूल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडला आहे . कल्याणच्या दिशेला येण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पत्री पुला वरून भरधाव पणे वाहन चालक आपली वाहने चालवीत असल्याने वारंवार अपघात घडत असल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे . पालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठा मोठे प्रकल्प राबविण्यात येत असून शहरातील मुख्य रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे पत्री पुला वरून कल्याणच्या दिशेला येताना दुचाकी वाहनचालक आपली वाहने भरधाव चालवीत असतात सोमवारी अशाच एक अपघात दुचाकी वाहन स्वरांचा घडला या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या वाहन चालकांला मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी तात्काळ श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले .वारंवार घडणाऱ्या अपघाता मुळे पत्री पुलाच्या दोन्ही दिशेला सिग्नल यंत्रणा बसवावी या करिता कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका प्रशासनांकडे पत्र व्यवहार करून ही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे व पत्री पुलावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा रुपेश भोईर यांनी या वेळी दिला आहे .