Now Loading

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

गडचिरोली :- मुलचेरा तालुक्यातील काकरगट्टा येथील जय सेवा युवा - मंडळ यांच्या वतीने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज या स्पर्धेचा उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चुटगुंठा ग्राम पंचायतीचे सरपंचा सौ. सपना मडावी उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुरेश मडावी, ग्राम पंचायत सदस्य कालीदास कुसनाके, लगामचे माजी सरपंच मनिष मारकटवार, जामगावचे प्रतिष्ठित नागरिक व्येकटेंश धानोरकर हे उपस्थित होते. सदर स्पर्धेसाठी ऐकून तीन पारितोषिक ठेवण्यात आले असून पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिलीप सिडाम, अमर कोडापे, रवि श्रीरामवार, शुभम ऊरेते व गावातील नागरिक उपस्थित होते.