Now Loading

शाहिद कपूरने शेअर केले 'जर्सी'चे नवीन पोस्टर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर मोस्ट अवेटेड 'जर्सी' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. शाहिद आणि मृणाल ठाकूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, शाहिदने या चित्रपटातील त्याचे आवडते पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. पोस्टरमध्ये शाहिद बाप होण्याचे कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावर तो आपला मुलगा किट्टूच्या बुटाचे लेस बांधताना दिसत आहे. नुकताच जर्सीचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अधिक माहितीसाठी - NDTV TV 9