Now Loading

माऊलींच्या कर्मभुमीत संजीवन समाधी निमित्ताने ७२५ दिव्यांचा दीपोत्सव.

नेवासा - ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला... या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते... सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या दीपोत्सवाप्रसंगी "पैस" खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले... त्यानंतर वारकऱ्यांच्या हस्ते पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात आला...