Maharashtra: राज्यातील कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरीएंटचा पहिला रुग्ण बरा झाला

महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनची (Omicron) लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु सध्या त्याला सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशात दिवसेंदिवस ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत देशभरात या प्रकाराची 33 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यापैकी बहुतांश प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांबाबत केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले असून कठोर कारवाई करत आहेत. डॉक्टर आणि तज्ञांनी देखील लोकांना याच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 20 ओमिक्रॉन संक्रमित लोक आढळले आहेत, तर राजस्थानमध्ये 9, दिल्लीत 1, गुजरातमध्ये 1 आणि कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत.