Now Loading

सीडीएस बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार होणार

तामिळनाडूतील (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat), त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जण ठार झाले. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर तामिळनाडूतील वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टर अपघातातील मृतांचे पार्थिव तामिळनाडूतील वेलिंग्टन मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोकांना सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत श्रद्धांजली वाहण्याची परवानगी दिली जाईल, त्यानंतर अंत्ययात्रा काढली जाईल.

 

सविस्तर माहितीसाठी :- Saam TV | India.Com | Max Maharashtra | Times Now