Now Loading

राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण स्टारर 'RRR' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित 'आरआरआर' (RRR) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये राम चरण आणि एनटीआर ज्युनियरची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना गूजबंप देईल. ब्रिटीश राजवटीसोबतच्या युद्धाच्या या कथेत मैत्री, विश्वासघात आणि देशभक्तीच्या भावनांचा थरार दाखवण्यात आला आहे. 'बाहुबली - द बिगिनिंग' आणि 'बाहुबली 2- द कन्क्लूजन' हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी चित्रपट बनवल्यानंतर एसएस राजामौली आरआरआर (Rise Roar Revolt) घेऊन येत आहेत. हा नवीन चित्रपट 7 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. RRR हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो मूळत: तेलुगु भाषेत बनलेला आहे, परंतु तो तमिळ, मल्याळम, कन्नडसह हिंदीमध्ये प्रदर्शित होईल.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- ABP | News Track | India TV | Times Now