ओमिक्रॉनची भीती वाढली, 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे बंद राहणार

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी माहिती दिली आहे कि भारत पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे स्थगित करण्यात आले आहे. डीजीसीएने 1 डिसेंबर रोजी कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकारावरील वाढत्या चिंतेमुळे 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. याच्या आठवडाभरापूर्वी, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा केली होती. पण गुरुवारी एक परिपत्रक जारी करून, डीजीसीएने म्हटले आहे की, "सक्षम प्राधिकरणाने भारतात आणि भारतातून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांचे निलंबन 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." तथापि, हे निलंबन DGCA ने मंजूर केलेल्या सर्व मालवाहू उड्डाणांना लागू होणार नाही.
सविस्तर माहितीसाठी :- India.Com | Lokmat | Saamana | Web Dunia