Now Loading

लग्नबंधनात अडकले विकी कौशल आणि कतरिना कैफने, सोशल मीडियावर फोटो वायरल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे या जोडप्याने शाही पद्धतीने लग्न केले. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत जोडप्याने लिहिले, "आम्हाला या क्षणापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना तुमचे सर्व प्रेम आणि आशीर्वाद मागतो." या जोडप्याने सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले पारंपारिक पोशाख परिधान केले होते. कतरिनाने चमकदार लाल लेहंगा निवडला तर विकीने बेज शेरवानी घातली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने वायरल आहे आणि त्यांचे चाहते व बॉलीवूड सेलेब्रिटी लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Maharashtra TimesNews 18 | Times Now