Now Loading

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 पर्यंत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) बैठकीत 2021-22 ते 2025-26 या काळात प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, या योजनेसाठी 93 हजार कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बोर्डांच्या निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी PLI योजनेलाही मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय सरकारचे मोठे पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले आहे. PMKSY मुळे देशातील 22 लाख शेतकऱ्यांचे जीवन बदलेल आणि या योजनेत जितके अधिक प्रकल्प समाविष्ट केले जातील तितके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

 

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat NBT | Live Mint