Now Loading

ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेट विश्वचषक 2022 (World Cup 2022) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना 6 मार्च रोजी होणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना 4 मार्च रोजी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. 31 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे 30 मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना 31 मार्च रोजी क्राइस्ट चर्च मैदानावर खेळवला जाईल, तर विजेतेपदाचा सामना 3 एप्रिल रोजी येथे खेळला जाईल.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Latestly | Loksatta | The Hindu | News 18