Now Loading

Kerala: हायकोर्टाने लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्याची याचिका फेटाळली

केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) कोरोनाव्हायरस लसीच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे छायाचित्र काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. याचबरोबर हायकोर्टाने याचिकाकर्त्याला न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याचिकाकर्त्याला दंडाची रक्कम येत्या सहा आठवड्यांत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. जर रक्कम जमा केली नाही तर केरळ राज्य विधी सेवा प्राधिकरण ही रक्कम याचिकाकर्त्याच्या मालमत्तेतून मिळवू शकते. गेल्या सुनावणीत न्यायमूर्ती पी कुन्हीकृष्णन यांनी याचिकाकर्त्याला सांगितले होते की, जर देशाच्या विद्यापीठाला माजी पंतप्रधानांचे नाव दिले जाऊ शकते, तर लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यात काही गैर नाही.