Now Loading

Omicron: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील कोविड-19 संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

देशभरात कोरोना व्हायरसचा संक्रमण कमी होत आहे. पण आता दुसरीकडे कोरोनाच्या नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रोनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देशातील कोविड-19 संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. याची माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. भारत आता पर्यंत ओमिक्रोनच्या रुग्णांची एकूण संख्या 236 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे नोंदवले गेली आहेत. 236 रुग्णांपैकी 104 रुग्ण बरे झाले आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि काही निर्बंधही लागू केली जाऊ शकतात.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- ABP | Jagran