Haryana: राज्य सरकारने कायदेशीर दारू पिण्याचे वय 25 वरून 21 वर्षे केले

दिल्ली सरकारनंतर आता हरियाणा सरकारनेही (Haryana Government) दारू पिण्याचे आणि विक्रीचे कायदेशीर वय 25 वर्षांवरून 21 वर्षे केले आहे. राज्य सरकारने बुधवारी उत्पादन शुल्क कायद्यात सुधारणा करून राज्यातील दारूचे सेवन, खरेदी किंवा विक्रीचे कायदेशीर वय 21 वर्षे केले आहे. हरियाणा उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, 2021 हे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सादर केल्यानंतर राज्य विधानसभेने मंजूर केले. उत्पादन शुल्क कायद्यात वरील तरतुदींचा समावेश झाल्यापासून आजच्या काळातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती बदलली असल्याचे ते म्हणाले. त्यात असेही म्हटले आहे की लोक आता अधिक शिक्षित झाले आहेत आणि जबाबदारीने दारू पिण्याबाबत तर्कशुद्ध निर्णय घेऊ शकतात.