Odisha: ओडिशा सरकारचा मोठा निर्णय, 3 जानेवारीपासून इयत्ता 1 ते 5 पर्यंतच्या सर्व शाळा पुन्हा सुरू होतील

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन संसर्ग वेगाने पसरत आहेत, अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अनेक कठोर नियम लागू केले आहेत. दरम्यान, ओडिशा सरकारने (Odisha Government ) एक मोठा निर्णय घेतला आहे. ओडिशा सरकारने 3 जानेवारीपासून इयत्ता 1 ते 5 वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 27,000 शाळा सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा सुरू होतील. यावेळी 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाची लस दिली जाईल. ओडिशाचे शाळा आणि सार्वजनिक शिक्षण मंत्री समीर रंजन दास यांनी बुधवारी ही माहिती दिली.