Now Loading

धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांना खजुराहो येथून अटक

धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विरोधात अपमानास्पद आणि कथित प्रक्षोभक भाषण देणाऱ्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj)  यांना छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. कालीचरण यांच्याविरोधात रायपूरमध्येही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रायपूर पोलिसांचे एक पथक त्याला मध्य प्रदेशातून छत्तीसगडमधील रायपूरला घेऊन जात आहे. एसपी रायपूर प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, कालीचरण महाराज मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. आज पहाटे ४ वाजता रायपूर पोलिसांनी त्याला अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन रायपूरला पोहोचेल.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Times Now | Maharashtra Times | Loksatta | ABP