Now Loading

Mumbai: मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू, नवीन वर्षाच्या उत्सवावर आणि पार्ट्यांवर पूर्णपणे बंदी

देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) ओमिक्रॉन अणि कोविड-19 प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता, कलम 144, 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या कालावधीत शहरात नवीन वर्षाचे उत्सव आणि पार्ट्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत मुंबईतील मोकळ्या जागेत किंवा बंद जागेत कोणत्याही प्रकारची पार्टी करण्यास बंदी असेल. यामध्ये रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बार, रिसॉर्ट्स आणि क्लब यांचाही समावेश असेल. कलम 144 चे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिस कारवाई करतील. मुंबईत कोरोनाव्हायरस संसर्गाची 2,500 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या नवीन प्रकरणांच्या तुलनेत 82% नी जास्त आहे. या कालावधीत महाराष्ट्रात 20 हून अधिक मृत्यू झाले आहेत.