जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया कोरोनाच्या विळख्यात, दिग्दर्शक राहुल रवैललाही कोरोनाची लागण

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या साखळीत अनेक बॉलिवूड सेलेब्स देखील कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. गेल्या महिन्यात करीना कपूर खान, अमृता अरोरा, शनाया कपूर, अर्जुन कपूर यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच आता जॉन अब्राहम (John Abraham) आणि राहुल रवैल यांच्या नावाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. जॉन अब्राहमने सांगितले की, त्यांचा आणि पत्नी प्रिया रुंचालचा (Priya Runchal) कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोशल मीडियावर माहिती देताना जॉनने सांगितले की, त्याने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. यासोबत त्यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | TV 9 | ABP | Zee News | Nai Dunia | Aaj Tak | Times Now