Now Loading

Delhi: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची बाधा, घरीच आयसोलेट झाले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, ही माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे, ते म्हणाले, 'मला कोरोना झाला आहे, संसर्गाची सौम्य लक्षणे पाहून, मी स्वत: ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्यासोबत जे लोक संपर्कात आले आहेत, कृपया त्यांनी स्वत:ला वेगळे करा आणि चाचणी करून घ्या.'  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच अनेक रॅली घेतल्या होत्या, त्यापैकी काही रॅलींमध्ये त्यांनी मास्कशिवाय लोकांना संबोधित केले आणि अनेक लोकांशी संवादही साधला.