Now Loading

ICC महिला विश्वचषक 2022: BCCI ने महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा केली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 (ICC Women's Cricket World Cup 2022) साठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया यजमान न्यूझीलंडशी पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि एकमेव T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. बोर्डाने या एकदिवसीय मालिकेसाठी महिला संघाची घोषणा देखील केली आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली, संघ 11 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. महिला क्रिकेट विश्वचषक 6 मार्चपासून सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी संघात मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती, शैफाली, यस्तिका, दीप्ती, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेहा राणा, झुलन, पूजा, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया (विकेटकीपर), राजेश्वरी आणि पूनमचा समावेश केला गेला आहे. 

 

 

सविस्तर माहितीसाठी :- TV 9 | Web Dunia