Now Loading

आदित्य चोप्राने शाहरुख खानच्या 'पठाण' आणि सलमान खानच्या 'टायगर 3'सह अनेक चित्रपटांचे शूटिंग केले रद्द

कोरोना महामारीने प्रत्येक क्षेत्राचे आणि लोकांचे नुकसान केले असले तरी चित्रपट उद्योगाचे काही विशेष नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून अनेक चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. तसेच आता, सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर-3' (Tiger-3) आणि शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'चे (Pathan) शूटिंग शेड्यूल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार, यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) कोरोना प्रकरणांमुळे आपल्या तीन प्रमुख चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलले आहे. ज्यात पठाण, टायगर-3 आणि इरफान खानचा मुलगा बाबील याच्या वेब सीरिजचा समावेश आहे. पठाणच्या सेटवर क्रू मेंबर्सची संख्या जास्त आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शकांनी काही चित्रपट आणि वेब सीरिजचे शूटिंग पुढे ढकलले आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Jagran Pinkvilla