Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या मागणीवर पंतप्रधान मोदींनी या राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. दरम्यान, देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरांवर पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान म्हणाले की केंद्राने गेल्या नोव्हेंबरमध्ये इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले आणि राज्यांना कर कमी करण्याची विनंती केली. मी कोणावरही टीका करत नाही, पण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांना व्हॅट कमी करून लोकांना लाभ देण्याची विनंती करतो. पीएम मोदींनी रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही उल्लेख केला.
सविस्तर माहितीसाठी :- TV 9 | Pudhari
ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा