Now Loading

महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ

महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून 50 रुपयांनी वाढली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची वाढलेली किंमत आजपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. यानंतर आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर होणार आहे. यापूर्वी 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट मोठ्या प्रमाणात बिघडू शकते. याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र, सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- TV 9 | News 18 | Lokmat 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा