Now Loading

Motorola Edge 30 स्मार्टफोन 12 मे रोजी लॉन्च होईल

Motorola ने आपल्या नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 च्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन 12 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. हा जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन असेल असा दावा कंपनीने केला आहे. Motorola Edge 30 ची जाडी 6.79mm असेल आणि वजन 155 ग्रॅम असेल. Edge 30 स्मार्टफोनमध्ये सेगमेंट-लीडिंग 144Hz pOLED 10 बिट डिस्प्ले आहे. कंपनीच्या मते, हा भारतातील पहिला स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट सपोर्ट आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये ५० मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, HDR10 व्हिडिओ रेकॉर्डिंग, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 33W टर्बो चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- News 18 | TV 9 | NBT 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा