Now Loading

IPL 2022: गुजरात टायटन्स हा लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या संघाचे नाव निश्चित झाले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. टाटा आयपीएल 2022 चा 57वा सामना मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव करत ही विशेष कामगिरी केली आहे. हे दोन्ही संघ प्रथमच आयपीएल खेळत आहेत. दोन्ही संघांची कामगिरी इतर संघांपेक्षा सरस आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 144 धावा केल्या. फलंदाजीला उतरलेल्या लखनौचा संघ 82 धावांत सर्वबाद झाला आणि गुजरातने पुन्हा 9वा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- India.Com | Lokmat News 18 | Loksatta 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा