Now Loading

जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर स्टारर 'एक व्हिलन रिटर्न्स' 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याच्या सिक्वेलची घोषणा झाल्यानंतर चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) ची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट यावर्षी 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. जॉनने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे. हा चित्रपट आधी 8 जुलैला रिलीज होणार होता, पण आता 29 जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमशिवाय अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. एक व्हिलन 2014 मध्ये रिलीज झाला आणि त्यात रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि प्राची देसाई मुख्य भूमिकेत होते.

 

 

सविस्तर माहितीसाठी :-  E 24 Web Dunia | News Bytes

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा