Now Loading

IPL 2022: आज डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने

आयपीएल 2022 (IPL 2022) चा 58वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळवला जाईल. राजस्थान रॉयल्स शानदार कामगिरी करत पॉइंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानचे 11 सामन्यांत 7 विजयासह 14 गुण आहेत. त्याच वेळी, दिल्लीचेही तितक्याच सामन्यांतून 10 गुण आहेत. अशा स्थितीत दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर पुढील तीन सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे, राजस्थानला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. आजचा सामना डीवाय स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियममध्ये 17 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 8 सामन्यात संघाने प्रथम फलंदाजी करत 9 मध्ये धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना अतिशय रंजक होण्याची अपेक्षा आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- News 18 | Times Now | Etv Bharat 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा