Now Loading

कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

69 वर्षांनंतर टाटा सन्सच्या बॅगेत आलेल्या एअर इंडियाबाबत (Air India) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता एअरलाइन कंपनीचे नेतृत्व कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांच्याकडे असेल. टाटा सन्सने गुरुवारी या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे सीईओ (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे." विशेष म्हणजे, संपादनानंतर, तुर्कीच्या इल्कर आयसीची एअर इंडियाचे पहिले सीईओ म्हणून निवड झाली. मात्र वादामुळे त्यांनी माघार घेतली. यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. पण एअर इंडियाला कमांड देण्यासाठी टाटा सन्सने ५० वर्षीय कॅम्पबेल विल्सन यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

 

 

सविस्तर माहितीसाठी :- Pudhari | Sakal | Amar Ujala | NDTV

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा