Now Loading

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा राजीनामा

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लवकरच नवा नेता निवडला जाईल. आज सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तेथे भाजपचे पर्यवेक्षक भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे उपस्थित आहेत. सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड होणार आहे. 2018 पासून बिप्लब कुमार देब मुख्यमंत्रिपदावर होते. गेल्या काही दिवसांपासून हायकमांड बिप्लब कुमार देब यांच्या कार्यशैलीवर फारसे खूश नव्हते असे मानले जाते. दरम्यान, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकाही पुढील वर्षी होणार आहेत.

 

 

ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा