बुद्ध पौर्णिमेनिमित्त PM मोदी आज नेपाळच्या लुंबिनीला जाणार, मायादेवी मंदिरात करणार पूजा

आज देशात आणि जगभरात बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळमधील लुंबिनीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी दिल्लीहून कुशीनगरला रवाना झाले आहेत. येथून ते लुंबिनीकडे रवाना होतील. विकास, जलविद्युत आणि कनेक्टिव्हिटी अशा अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे. पीएम मोदी रात्री 10 वाजता नेपाळला पोहोचतील आणि संध्याकाळी दिल्लीला परततील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी मायादेवी मंदिरात पूजा करतील आणि लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करतील. लुंबिनी मठ परिसरात बौद्ध संस्कृती आणि हेरिटेज सेंटरच्या पायाभरणी समारंभातही पंतप्रधान सहभागी होतील.
सविस्तर माहितीसाठी :- TV 9 | Nai Dunia | TV 9
ही बातमी शेअर करा आणि आपण शेर केलेल्या लिंकवर प्रत्येक व्ह्यूसाठी कॉईन्स मिळवा