Now Loading

"तथागत गौतम बुद्ध यांना बारामतीत अभिवादन"

बारामती : माणसाने प्रथम माणूस बनले पाहिजे. माणूस जेव्हा माणसाशी माणुसकीने वागेल तेव्हा खऱ्या अर्थाने न्याय,समता,स्वातंत्र्य,बंधुता प्रस्थापित होईल. जेव्हा असे घडेल तेव्हा बुद्धांची आणि बाबासाहेबांची विचारधारा प्रस्थापित होईल. ही विचारधारा पायाने जाऊन घराघरात पोचणार नाही. यासाठी समाजातील नव तरुणांनी,शिक्षकांनी,प्राध्यापकांनी, डॉक्टरांनी,वकिलांनी जाणीवपूर्वक समाजात ही विचारधारा रुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,असे मत बामसेफचे जिल्हाध्यक्ष आनंद थोरात यांनी व्यक्त केले. विश्वाला शांतीचा संदेश देऊन मानव हिताचे कार्य करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमावेळी थोरात बोलत होते यावेळी बसपाचे नेते काळूराम चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,या देशातील पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध होते. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण सर्वांनी जाण्याची गरज आहे. आज जगाचा विचार केला तर जगाला बुद्धांच्या विचाराशिवाय पर्याय राहिला नाही. आपल्या देशाला बुद्धांचा देश म्हणून ओळखले जाते. आपले पंतप्रधान विदेशात जातात तेव्हा ते बुद्धच दाखवतात,असे सांगून भारत देशात विविध ठिकाणी होत असलेल्या उत्खननात बौद्धकालीन अवशेष आढळून येत आहेत,मग येथील बुद्ध गेले कुठे असा प्रश्न उपस्थित करून बौद्धकालीन इतिहासावर प्रकाश टाकला. दरम्यान या कार्यक्रमाला बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,माजी नगरसेवक गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ,माजी नगरसेविका मयुरी सुरज शिंदे,आरती शंकर गव्हाळे,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,किशोर सोनवणे,प्रा.डि.व्ही.सरोदे,दिनेश जगताप,विजय खरात,साधू बल्लाळ,सिद्धांत सावंत,अजित कांबळे,उत्तम धोत्रे आदी उपस्थित होते. कर्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,परीक्षित चव्हाण,विश्वास लोंढे,सचिन जगताप,संतोष जगताप,विकास जगताप यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे यांनी केले.