Now Loading

रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी, केंद्र सरकार विरोधात आंदोलन

भेकराई नगर हडपसर - ( प्रतिनिधी ) : गैस सिलिंडर, डीझेल-पेट्रोल दरवाढ या मुद्द्यावर केंद्र सरकार विरोधात पुणे-सासवड रस्ता भेकराईनगर येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर चूल मांडून त्यावर महिला शिवसैनिकांनी भाकरी थापल्या. शिवसेना उपशहरप्रमुख राजाभाऊ होले म्हणाले की, २०१४ मध्ये महागाई विरोधात आवाज उठवूनही सरकारकडून गाजर दाखवण्या आला. सत्तेत आलेल्यांनी महागाईचा कहर करून कंबरडेच मोडले. डिझेल-पेट्रोल जर जीएसटीच्या कक्षेत आणले तर त्याचा दर ६०/७०रु. पर्यंत खाली येईल व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. उज्वला गॅस योजनेचे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. शिवसेनेचे हवेली - पुरंदर विधानसभा प्रमुख शंकर हरपळे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने डाळी, कडधान्ये, तेल सर्वच गोष्टी महाग करून ठेवल्या आहेत. त्यातच अनेक जण सध्या बेरोजगार असल्याने केंद्र सरकारचे धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. याप्रसंगी युवासेनेचे गद्रे, उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी, हवेली महिला आघाडी संघटिका सविता ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी जि. प. सदस्या कौशल्या हरपळे, विभागप्रमुख रवींद्र बोरावके, उपविभागप्रमुख रवींद्र बेल्हेकर, प्रभाग प्रमुख विनोद सातव, राकेश मांढरे, संतोष गद्रे शाखाप्रमुख संदीप तुकाराम घोडकेसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.